अज्ञाताने लावली तुरीच्या गंजीला आग
कंरजी येथील शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्या - तुलसी अलाम
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करजी येथील शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या. तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावली. यांत शेतकऱ्याची तुरीची गंजी जाळून भस्मसात झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.करजी येथील अनिकेत दशरथ दाते या शेतकऱ्याने शेतात तुरीची लागवड केली होती. तुरीचे पीक काढणीला आल्याने अनिकेत यांनी शेतात तुरीची कापणी करून गंजी लावली होती.रात्रीच्या अंधारात अज्ञात इसमाने तुरीच्या गंजीला आगलावली. सकाळी अनिकेत शेतात पोहोचला पाहतो तर तुरीची गंजी भस्तसात झालेली दिसली या आगीत शेतकरी अनिकेत दाते यांचे 25 ते 30 क्विंटल तुरीचे नुकसान झाले आहे सदर घटनेची तक्रार अनिकेत दाते यांनी वरोरा पोलिसात दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करीत घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करून शिक्षा देण्यात यावी आणि शेतकऱयाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तुलसी अलाम यांच्या वतीने होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!