जांभुळघाट येथील सिमेंट काँग्रेटींग प्लॅन्ट मध्ये अवैध रेती चा साठा मोठ्या प्रमानात

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील सिमेंट काँग्रेटींग प्लॅन्ट मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा साठा असल्याने या रेती साठ्या वर महसुल विभाग कार्यवाही करणार का? चिमुर तालूक्यात शासकिय बांधकामात मोठ्या प्रमाणात सुरु असून अवैध रेती व अवैध मुरूमाचा वापर होत आहे.पण महसुल विभागाची व इतर प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. दिखाव्यासाठी एखादी कारवाई केली जाते. पण मोठी कारवाई करताना प्रशासन दिसन नाही.या मागे अभिकाऱ्या वर राजकीय दबाव तर नाही ना ? बरेश्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अवैध धंद्या वर कार्यवाही केली असता अधिकाऱ्यांना मोठ्या लोकप्रतिनिधी चा फोन येत असतो यामुळे नाईलाजाने अधिकारी व कर्मचारी वर्गा वर दबावतंत्रात शांत बसत असतात. यामुळे कारवाई थांबवण्यात येते असेही अनेकदा बघावयास मिळत असते. हे अवैध धंदे ८० टक्के मोठ्या लोकप्रतिनिधी व मोठ्या राजकीय पदाधिकारी तथा कार्यकर्ता यांचे असते.म्हणूनच प्रशासना हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याची हिम्मत दाखवीत नसतात.रात्रो १० वाजले की अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे वाहाने आप-आपल्या रेतीच्या ठिया वर पोहचत असतात. कोण जास्त फेऱ्या मारतो अशाप्रकारचे चित्र नेहमीच बघायला मिळत असते जेणेकरून एक प्रकारे स्पर्धाच लागली. सकाळच्या ६ वाजेपासून तर रात्रभर अवैध रेतीचे वाहन तालूक्याच्या सर्व ठिकानी सुरू असतात.काही अवैध रेती माफीया बरोबर अधिकारी व कर्मचारी यांची साठगाठ असल्याने काही रेती माफीयांवर माहितीच्या आधारे कारवाई होतांना दिसत नाही.यामुळे अवैध धंदे करणारे यांची मुजोरी वाढलेली दिसून येते. हे सर्व प्रकार उघळ सत्य म्हणून जनतेसमोर मांडण्याच्या वृत्तीने वृत्तपत्रात लेख प्रकाशित करीत असतो परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पत्रकारांवरच नियमीत प्राणघातक हल्ले होतांना दिसत असतात.याकडे खरोखरच प्रशासन लक्ष देऊन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार का? अशाप्रकारे सर्वत्र ठिक - ठिकाणी समाजप्रबोधन कार्यक्रमात अधिकारी तथा राजकीय शैली देखावा करीत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!