नेरी ग्राम पंचायत कडून हेतुपुरस्सर बुद्ध विहाराच्या मालमत्तेची नासधुस
बौद्ध बांधव धडकले ग्राम पंचायत वर
नुकसान भरपाईची मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथे महामुनी बुद्ध विहाराच्या आवारात ग्रा.प.चे सोलर बोर असुन त्याची योग्यरित्या जनतेला सेवा घेता यावी करीता विहार समिती द्वारे मागील काही वर्षापासून ग्रा.प. ला विनंती अर्ज करण्यात आले परंतु ग्रा.प. नेरी तर्फे वेगवेगळी थातुरमातुर कारणे देऊन सोलर बोर व्यवस्थित ठिकाणी लावणे बाबत टाळाटाळ करण्यात आली.मात्र दिनांक. ४ फेब्रुवारी २०२५ ला ग्रा.प.ला अचानक कामाचा कळवळा दाटून आला व बौद्ध विहाराच्या सदस्य यांना कुठलीही लेखी किंवा तोंडी सूचना व माहिती न देता काम करण्याच्या नावाखाली विहाराची जाळी कापण्यात आली व ती जाळी तशीच खुली सोडण्यात आली.या मनमानी हेतुपुरस्सर हिन कारवाई बद्दल विचारणा करण्यासाठी सरपंच रेखा पिसे यांना संपर्क केला असता त्यांनी बौद्ध बांधवांना ग्रा.प.ला येण्यास सांगितले सांयकाळी ०६:४५ ते ०७:३० वाजे पर्यंत बौद्ध बांधव ग्रा.प. मध्ये सरपंचाची वाट बघत राहिले संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सरपंच रेखा पिसे यांनी फोन ऊचलने बंद केले व ग्रा.प. ला सुद्धा आल्या नाहीत अशा पद्धतीने त्यांनी बौद्ध बांधवांना त्रास देण्याचे कार्य केले.काम करून देण्याच्या नावाखाली हि कारवाही बौद्ध विहाराच्या मालमत्तेची नासधुस रमाई जयंतीच्या कार्यक्रमात खोडा निर्माण व्हावा हे सर्व हेतुपुरस्सर विशिष्ट समुहाला खुश करण्यासाठी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.तरी नेरी ग्रा.पं.च्या सरपंच रेखा पिसे यांनी या संपूर्ण घटने बाबत चे उत्तर सादर करावे आणि योग्य कारवाई करण्यात यावी व झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बौद्ध समाज बांधव यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!