सापळा रचून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांवर उपविभागीय अधिकारी यांचा दणका


उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरु असल्याने शासनाच्या महसूलाची दिवस रात्र सर्रास चोरी सुरु आहे.हे लक्षात घेता यामुळे जिल्ह्यात सर्वत्र धाडसत्र सुरु आहे.महसूल पथक या रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी सक्रियता दर्शवीत असून त्यांचेवर सुद्धा माफियांचे हल्ले होतांना दिसून येत आहे.वरोरा तालुक्यात आताच दोन घटना घडल्या असल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे.म्हणून दिनांक. ०४ फेब्रुवारी २०२५ ला रात्री ०८:०० वाजताच्या सुमारास महसूल पाथकांनी मिळून सापळा रचून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या अनेक हायवा वाहनांवर कारवाई केली. हि कारवाई उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तथा तलाठी यांनी सामोहिक रित्या केली असून या कारवाईमुळे जिल्ह्यात रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!