गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दिकी यांची शिवराज्य वाहतूक सेनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - गुलाम गौस अब्दुल हमीद सिद्दिकी यांची शिवराज्य वाहतूक सेनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी किरण मिलिंद जाधव उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (शिवसेना शिंदे गट) यांनी नियुक्ती केली असून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहतूक दारांशी संपर्क साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व संघटन वाढीसाठी कार्य करावे आणि दिलेल्या पदाचा सन्मान राखावा तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे काटेकोर पणे पालन करावे अशाप्रकारे सूचना देण्यात आली. यावेळी शिवराज्य वाहतूक सेनेचे मार्गदर्शक राहुल रमेश शेवाळे (माजी खासदार) यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष अब्दुल समद शेख यांच्या आदेशाने युवासेना सचिव शुभम नवले तथा युवा सेना कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे यांच्या उपस्थितीत हा पद नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!