अवैध मुरूम उत्खनन जोमात,महसूल विभाग कोमात
महसूल विभागाच्या आशिर्वादाने मुरून तस्करांची चांदीच चांदी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगांव बु येथून जवळच असलेल्या खेमजई - पोहा मार्गावरील रत्नाळा रिठ या रेव्हणी सर्कल भागातून मागील अनेक दिवसांपासून अहोरात्र दिवसा ढवळ्या जेसीबीनी मुरुमाचे अवैध उत्खनन करून टीप्पर, ट्रक, ट्रॅक्टर च्या माध्यमातुन अवैधरित्या मुरमाची तस्करी केल्या जात आहे अगदी वरोरा,शेगाव रोड लगत हे अवैध मुरूम उत्खनन सुरू असून तरीही महसूल विभाग याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असुन शासनाच्या तिजोरीला लाखोंचा चुना लागणारी ठरनारी आहे.या अवैध मुरूम उत्खननाच्या वाहतुकीमुळे रत्नाळा रीठ येथील शेतकऱ्यांच्या पांदन रस्त्याचे तीनतेरा वाजले असून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे शेतकरी व शेतमजूर यांना बैलबंडी सुद्धा नेणे अवघड झालेले आहे या पांदन रस्त्याने जातांना अत्यंत शेती हंगामात त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील महसूल विभाग कुंभकर्णी झोपेतून कधी जागा होईल अशी चर्चा शेतकरी व नागरिकांमध्ये सुरू आहे. अवैध मुरूम उत्खननाच्या जागेला शेत तलावाचे तसेच खदानीचे रूपांतर झाले असून एखादी घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अवैध रित्या मुरूम उत्खनन करणाऱ्यावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही का करत नाहीत?असे प्रश्न आता या भागातील शेतकरी व नागरिक करू लागले आहेत तरी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या तस्करावर कायदेशीर कार्यवाही करावी तसेच या अवैध मुरूम तस्करांना अभय देणाऱ्या तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी या परिसरातून शेतकरी, शेतमजूर व स्थानिक नागरिक करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!