सिंदेवाही - सायखेडा मुक्कामी बस सुरु... खुशाल लोडे यांच्या पाठपुराव्याला यश @ श्रमदानाने रहदारीतील झाडे तोडून मार्ग केला खुला

 

सावली - सिंदेवाही, पाथरी, पालेबारासा, जनकापूर, सायखेडा या अडचणीच्या जंगलग्रस्त भागातील मार्गावर बससेवा सुरु करण्यात आली व रहदारीस अडथळा निर्माण झालेली झाडे श्रमदानाने तोडून मार्ग खुला करण्यासाठी व बस सेवा सुरु करण्यासाठी बाजार समितीचे संचालक खुशाल लोडे यांनी सहकारीसह पुढाकार घेतल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

      पालेबारासा, जनकापूर, सायखेडा ही गावे जंगलातील आहेत. या मार्गात इतर कोणतीही वाहतुकीची सुविधा नाही व हिंस्त्र प्राण्यांचा परिसर असल्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते. ही अडचणीची बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी कार्यालयात डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष भेटून निवेदणाद्वारे सायंकाळची मुक्कामी बस सुरु करण्याची मागणी संचालक खुशाल लोडे यांनी केली होती. सतत पाठपुरावा सुरु असल्याने अखेर सायखेडा गावात बस पोहचली. त्यामुळे चालक व वाहक यांचा संचालक खुशाल लोडे व गावाकऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी विठ्ठल मंगर, यादव वाघरे, मुक्तेश्वर वाघरे, वामन वाघरे, पवन दाखोटे, जितू टेभुर्णे, शामराव टेभुर्णे, अमर वाघरे, वामन देशमुख, एस चुधरी, विपुल कोरडे, अंकित साखरे, तन्मय लोडे, मनोज दाखोटे, गौरव काडसकर, शरद टेभुर्णे, हर्षल लोडे, सुनील झाडे, गौतम टेभुर्णे, विठ्ठल वाढणकर, नेवीन साखरे, कविंद्र चुधरी, पुरनदास टेभुर्णे, गिरमा साखरे, मुखरू वाघरे, केवळ वाघरे, वामन मोरदेवे उपस्थित होते.

      बस सुरु झाली परंतु जनकापूर ते सायखेडा मार्गांवर वाढलेल्या झाडे झुडूपांमुळे बसला रहदारीस अडचण होती. त्यामुळे सायखेड्याला बस जाण्याकरिता जनकापूर, पालेबारसा, सायखेडा असा सहा किमी फेरा मारून जावे लागत होते त्यामुळे ही अडचण सोडविण्याकरिता संचालक खुशाल लोडे यांनी हेमंत वाघरे, अशोक कावळे, यादव वाघरे, दीपक मंगर, गुलाब लोडे, हेमंत एन वाघरे, केशव मोहुर्ले, सुधाकर चरडे या सहकाऱ्यांना घेऊन रस्ता मोकळा करून दिला. यामुळे सुरळीत बस सेवा सुरु झाल्याने परिसरातील नागरिक खुशाल लोडे यांचे कौतुक करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!