चित्रांच्या दुनियेत विदयार्थी हरविले मूल येथील नवभारत विदयालयाच्या केंद्रावर भरभरून प्रतिसाद
चित्रांच्या दुनियेत विदयार्थी हरविले
मूल येथील नवभारत विदयालयाच्या केंद्रावर भरभरून प्रतिसाद
मूल :- मूल येथील नवभारत विदयालयाच्या केंद्रावर विदयार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.सकाळी 10 वाजता चित्रकला स्पर्धेला सुरूवात झाली.विदयार्थ्यांसोबत पालकांनी मोठी गर्दी केली होती. अ,ब,क आणि ड गटातील विदयार्थी मन ओतून आपल्या कल्पनेतील चित्रे काढीत होती.त्यात आपल्या आवडीचे रंग भरताना देहभान विसरत होती.विविध विदयार्थ्यांनी सुंदर संकल्पना साकारीत वैशिष्टयपूर्ण चित्रे काढली. चित्रकला स्पर्धेला सोमनाथ प्रकल्पाचे पंधरा विदयार्थी मूल केंद्रावर सहभागी झाले होते. सकाळ माध्यम समूहाच्या या चित्रकला स्पर्धेला नवभारत विदयालयाचे प्राचार्य झाडे सर,मूल येथील प्रसिदध मुर्तीकार गणेश रामशेटटीवार यांनी भेट दिली.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तालुका बातमीदार विनायक रेकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला शिक्षक भारत सलाम, रमेश माहूरपवार,प्रमोद म्हशाखेत्री,शशिकांत गणवीर,अमित राउत,राहूल आगडे,सोमनाथ प्रकल्पाच्या शिक्षिका सरस्वती गणवीर यांनी विशेष सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!