शेगांव (बु) प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांचे निराकरण करा - अक्षय बोदगुलवार यांची मागणी


तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - प्राथमिक आरोग्य केंद्र, शेगांव येथे परिसरातील 50 ते 60 गावातील नागरिक उपचारासाठी येत असतात त्यामूळे त्यांना वेळेवर उपचार होणे गरजेचे असते. परंतु  विविध समस्या अभावी रुग्णांची गैरसोय होत आहे याबाबत चंद्रपूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्रहारचे अक्षय बोंदगुलवार यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.

सदर समस्या मध्ये आरोग्य केंद्र दिवस रात्र शिफ्ट मधे २४ घंटे सुरू ठेवावे, १०८ नंबरची अँम्ब्युलन्स केंद्रात उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून परिसरातील नागरिकांना वेळेवर उपचार सुरू होण्यात मदत होईल.,तत्काळ एक्स-रे मशिन उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून रुग्णांना त्रास होणार नाही,पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर उपलब्ध करून देण्यात यावे,अपघाती रुग्णांवर प्राथमिक उपचार होईल याची व्यवस्था करण्यात यावी,वरील समस्यांचे तात्काळ नियोजन करून निराकरण करावे तसेच जनतेला दिलासा द्यावाअशी मागणी प्रहारचे जनसेवक अक्षय बोदगुलवार यांनी निवेदनातुन केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!