मूल उपजिल्हा रुग्णालय अधिकारीविना आजारी
मूल
मूल उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने हे रूग्णालय आजारी असल्याची टीका होत आहे
उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे 7 वैद्यकिय अधिकारी यांची मान्यता असून फक्त 2 वैद्यकिय अधिकारी यांचे नियमित पद व 2 कंत्राटी वैद्यकिय अधिकारी याची पदे भरण्यात आलेली असून एकाकडे वैद्यकिय अधिक्षक यांचा प्रभार आलेला आहे त्यामुळे रुग्णसेवा देण्यास वैद्यकिय अधिकारी याच्या कमतरतेमुळे अडचण निर्माण होत आहे उर्वरीत वैद्यकिय अधिकारी यांची पदे त्वरीत भरणेबाबत कार्यवाही करण्यात यावी उपजिल्हा रुगणालय मूल येचील स्त्रीरोगतज्ञ तसेच बधिरीकरण तज्ञ यांचे पद रिक्त असल्यामुळे आपत्कालीन प्रसुतीशस्त्रक्रिया करण्यात येत नाही त्याकरीता रुग्णाना चंद्रपुर ला संदर्भित करावे लागते करिता स्त्रीरोगतज्ञ याचे पद भरण्यात बाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे
रूग्णालयातील दंतशल्य चिकित्सक यांच पदे मागील ८ महिण्यापासून रिक्त असल्यामुळे रुग्णालयातील दंत सेवा बंद आहे त्यामुळे रुग्णांना चंद्रपुरला संदर्भित करावे लागत आहे त्यामुळे नियमित दंतशल्य चिकित्सक यांचे नियमित आयपीएचएस अतर्गत भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
उपजिल्हा रुग्णालय मूल येथे रडिओलॉजीस्ट उपलब्ध नसल्यामुळे नियमित सोनोग्राफी काढण्यात येत नाही आठवड्यातून दोन दिवस बुधवार व शुक्रवार सोनोग्रॉफी काढण्यात येते
जिल्हा रुग्णालय, मूल येचे अस्थिरोगतज्ञ व भिषक हे पद भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!