शालेय पोषण अंतर्गत तालुका स्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन


विविध खाद्यपदार्थांनी वेधले लक्ष

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.१५ फेब्रुवारी २०२५ ला पं.स.शिक्षण विभागामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शालेय पोषण आहार स्वयंपाकी यांचा सहभाग होता.फोर्टिफाईड तांदुळ बाबत जनजागृती करणे,तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना लक्षात आणून देणे या उद्देशाने सदर स्पर्धा सावित्रीबाई फुले कन्या शाळा पवनी येथे आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा,उद्घाटक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनीक तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख श्रीकृष्ण हाडगे, मुख्याध्यापिका सुजाता गजभिये आदींची उपस्थिती होती.परीक्षक म्हणून गटसमन्वयक दिपाली बोरीकर,साधन व्यक्ती मंजुषा दलाल, विषय शिक्षिका सरिता डाखोरे यांनी कामकाज पाहिले.प्रस्ताविक साधन व्यक्ती दिपाली बोरीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधनव्यक्ती डॉ.मुरलीधर रेहपाडे यांनी तर आभार प्रदर्शन कैलास शहारे यांनी केले. तालुक्यातील शहरी व ग्रामीण महिलांनी यात सहभाग घेतला. तृणधान्यापासून खीर, पकोडे,चपाती,गुलाब जामुन,वडे असे विविध पदार्थ बनविण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कांचन बाळबुधे भुयार केंद्र,द्वितीय क्रमांक संगीता श्रीरंगे आसगाव केंद्र,तृतीय क्रमांक लता नान्हे पिंपळगाव केंद्र यांनी प्राप्त केले.या स्पर्धेत तालुक्यातून ११ केंद्रांतर्गत १८ शालेय पोषण आहार स्वयंपाकी यांनी उपस्थित राहून पाककलेतील कला कौशल्य दाखविले. विजेते स्पर्धकांना गट शिक्षण अधिकारी शरदचंद्र शर्मा, शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समग्र शिक्षा अभियानचे कर्मचारी महेंद्र वाहने, रिना सावरबांधे,महेंद्र भुरे, अरविंद लांजेवार,अश्विन मेश्राम,देवा लांजेवार,विठ्ठल रामटेके,सावित्रीबाई फुले कन्या शाळेचे कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!