जांभुळघाट येथील तलाठी कार्यालय समोरच अवैध रेतीचा साठा

बांधकामावर ठेकेदार करतो अवैध रेतीचा वापर

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालूक्यामध्ये अवैध रेतीचा जणू पाऊसच सुरू असल्याचे दिसुन येत आहे.महसुल विभाग अवैध रेतीच्या पाऊसात गाळ झोपी गेल्याचे दिसत आहे.मौजा जांभुळघाट येथील ठेकेदार नविन इमारतीचे बांधकाम करीत आहे तेही तलाठी कार्यालयाच्या अगदी समोर पण त्या अवैध रेतीवर तलाठ्याची दृष्टी पडत असतांना देखील दुर्लक्ष करीत एखाद्या माजरी प्रमाणे डोळे बंद करून दुध तर पेत नाही ना..?ठेकेदार हा सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या लोक प्रतिनिधीच्या जवळचा असल्याचे समजते.चिमुर तालूक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती व मुरम उत्खनन सुरूच आहे यावर कोणत्याही विभागा तर्फे मोठी कार्यवाही होताना दिसत नाही. अधिकारी व कर्मचारी सत्ताधारी पक्षाच्या दबावात काम करीत तर नाही ना..? अश्या प्रकारचे विचार  जनते मध्ये सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यानी अश्या अवैध उत्खननावर कार्यवाही करून जनतेचा विश्वास जिंकने काळाची गरज आहे.यामुळे मुक्या जाणवरांना व शेती करीता पाणी मिळणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!