महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत महसुल सहाय्यक पदी निवड कु.पौर्णिमा बोरकर समाजातर्फे सत्कार.


महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत महसुल सहाय्यक पदी निवड कु.पौर्णिमा बोरकर समाजातर्फे सत्कार.
यश कायरकर:
  गिरगांव येथील कु.पौर्णिमा भास्कर बोरकर हिचे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत महसुल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल  गिरगांव येथील कु.पौर्णिमा बोरकर यांचे  घरी भेट देऊन कोहळी समाज मंडळ नागपूर व चंद्रपूर तर्फे अभिनंदन करण्यात आले.
        याप्रसंगी तिचा व पालकांचा पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित प्रा. माणिकराव लोथे सर सचिव कोहळी समाज मंडळ नागपूर, श्री. नानाजी पा. बोरकर अध्यक्ष कोहळी समाज चंद्रपूर, प्रा. विनोद बोरकर सर नवरगाव, प्रा. विनोदजी गहाणे नवरगाव, श्री. विनोदराव बोरकर उपाध्यक्ष कोहळी समाज मंडळ नवरगाव, प्रा. नलिनीताई लोथे नागपूर, श्री.विनायक बोरकर सर नवरगाव, श्री. शरदराव सोनवाणे गिरगांव, श्री. दयानंद बोरकर सर गिरगांव व इतर कोहळी समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!