चिंधिचक येथे अवलोकन व निराकरण शिबीर;
तळोधी (बा.) मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य द्वारा निर्धारित शभंर दिवस अंतर्गत सात कलमी कार्यक्रम अनुषंगाने तहसील कार्यालय नागभीड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चिंधीचक येथे समस्या अवलोकन निराकरण शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या शिबिरात शासकीय योजना बाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. ॲग्रीस्टॉक नोंदणी व प्रमाणपत्र, माती परीक्षण प्रमाणपत्र, ७/१२ नमुना ८ दाखले, नवीन मतदार नोंदणी, वृक्षलागवड,आदी विषयीं सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रताब वाघमारे, नायब तहसीलदार कावळे, ठाणेदार कोकाडे, आरोग्य विस्तार अधिकारी घाटोळे, कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, महावितरणचे सुरेश जांबुळे, बाल विकास प्र.अधिकारी शिला गेडाम,भाजपा तालुका महामंत्री जगदिश सडमाके, मंडळ अधिकारी बोड्डावार,तलाठी विकास मेश्राम,सरपंच हरिदास वरठे, उपसरपंच प्रदीप समर्थ,ग्रामसेवक रतन वासे, ग्रामपंचायत सदस्य गिरिधर नन्नावरे, विश्रांती सातपैसे, भावना लेनगुरे, संगणक आपरेटर राजू साहारे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र माहोरे, लोकेश लांजेवार,आर्मी चंद्रशेखर सातपैसे,वनरक्षक कुळमिथे,पोलिस पाटील प्रदिप धारणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!