नवेगाव(हुंडेश्वरी) येथे शंभर दिवस कृती आराखडयांतर्गत सात कलमी कार्यक्रम;
नवेगाव(हुंडेश्वरी) येथे शंभर दिवस कृती आराखडयांतर्गत सात कलमी कार्यक्रम;
तळोधी (बा.) मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य द्वारा निर्धारित १०० दिवस अंतर्गत ७ कलमी कार्यक्रम अनुषंगाने तहसील कार्यालय नागभीड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार प्रताप वाघमारे यांचे मार्गदर्शनात नवेगाव (हुंडेश्वरी) येथे समस्या अवलोकन निराकरण शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामधे महसूल विभाग, कृषी विभाग, वनविभाग, विजवितरण विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास आदी विविध विभागातील कर्मचारी यांनी शासकीय योजनाची माहिती सांगितली. त्यांमध्ये ॲग्रीस्टॉक नोंदणी व प्रमाणपत्र, सात बारा, नमुना आठ(अ) दाखले, वृक्षारोपण आदी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार उमेश कावळे हे होते. तर या कार्यक्रमाला महावितरणचे ढुमणे, बा.वि.प्र.अधिकारी शिला गेडाम, महसूल मंडळ अधिकारी सुभाष बोड्डावार,तलाठी राजेंद्र अतकरे, सरपंच नेवारे, ग्रामसेवक मुळनकर, क्षेत्र सहाय्यक तावाडे, वनरक्षक गुरुदेव नवघडे, पोलिस पाटील चौधरी, तसेच कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आदी विभागाचे कर्मचारी तथा गावांतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!