कॉमनमॅन दिनाचे अवचित साधून शिंदे गटाचे युवा जिल्हा प्रमुख यांनी केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त जनसामान्यांचा सत्कार

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - शिवसेनेचे मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त चंद्रपूर येथे युवा सेनेतर्फे समाजातील सामान्य माणसाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आगळा - वेगळा उपक्रम राबविला असून युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर यांच्या कार्यालयात कार्यक्रमात ‘कॉमनमॅन दिन’म्हणून साजरा करत युवा सेना चंद्रपूर तर्फे जन सामान्य नागरिकांचा गौरव करण्यात आला. शैलेश केळझरकर युवा सेना जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर , गुलाम घोस सिद्दिकी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष , शिरीष मानेकर चंद्रपूर तालुका समन्वयक, पवन यादव युवा सेना शहर अध्यक्ष, कमलाकर कुळमेथे युवासेना शहर उपाध्यक्ष , साहिल गनफाडे युवासेना शहर उपाध्यक्ष, प्रकाश मोहुले, बालाजी दयालवार, प्रदीप आसुटकर, ठाकूर मॅडम  यांच्या हस्ते चंद्रपूर येथील ६१ सामान्य नागरिकांना सन्मानित करण्यात आले. , भाजीवाले,  कर्मचारी, रिक्षाचालक, महिला रिक्षाचालक, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, पंडित, दूधवाला, आटा चक्की वाला, सलून, डिलेव्हरी बॉय, कुली अशा विविध क्षेत्रांत दिवसरात्र मेहनत करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कर्तृत्वासाठी सन्मान केला.चंद्रपूर युवासेनेच्या या उपक्रमाने सामान्य माणसाच्या जीवनातील संघर्ष, त्यांचे योगदान आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला उजाळा दिला. या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी मनापासून दाद दिली आणि या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!