Kcc कंपनीच्या निष्कर्षीमुळे एक ठार, दुसरा गंभीर जखमी...

Kcc कंपनीच्या निष्कर्षीमुळे एक ठार, दुसरा गंभीर जखमी...

वरोरा.... जगदीश पेंदाम

तालुक्यातील वरोरा ते चिमूर 353 ई राज्य मार्गाचे अनेक दिवसापासून काम सुरू असून अजून पर्यंत काम परिपूर्ण झाले नसल्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे,वरोरा ते चिमुर Kcc कंपनीचे काम सुरू असुन  रविवारला रात्रोला सातच्या दरम्यान चारगाव धरणाजवळ मातीच्या ढिगरावरून दुचाकी वाहन गेल्याने चंदनखेडा येथील बाबा महादेव ठावरी यांचा जागीच मृत्यू झाला असून नथू कु़डलिक साळवे, रा.काठवल भगत हे जखमी आहेत...
 Mh 34 ce 1377 दुचाकी वाहनाने बाबा ठावरी हे नातेवाईकातील तेरवीच्या कार्यक्रमाला गेले असता चंदनखेडा आपल्या गावाकडे परत येताना चारगाव धरण स्त्यावर मातीच्या ढिगार्‍यावर दुचाकी वाहन गेल्याने जागेवर पडून मृत्यू झालेला आहे.kcc कंपनीने मातीचे ढिगारे रस्त्यावर ठेवल्यामुळे अनेक दुचाकी वाहनधारकांना रात्रीच्या सुमारास   दुचाकी चालवताना त्रास सहन कराव लागत आहे, सात ते आठ वर्षात या रस्त्याने अनेकांनी जीव गमावले असून अजून पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही आहे, वरोरा ते चिमुर ठीक ठिकाणी रस्त्याचे काम अपुरे असून आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कंपनीकडून बॅरिगेट लावण्यात आलेली नसल्यामुळे अपघात होऊन नागरिकांना अपंगत्व आले आहे तसेच ठीक ठिकाणी सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा पडलेल्या असून अनेकांना दुचाकी वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे..
  या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत  पंचनामा करून  प्रेत उत्तरनीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले असून घटनेचा अधिक तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली psi सहारे करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!