भल्या पाहटे रेतीचा ट्रक सोडणाऱ्या चिमुरच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची चौकशी करा
वंचित बहुजन युवा आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.4 फेब्रुवारी 2025 ला चिमूर येथे अवैधरित्या रेतीचे वाहतूक करणारे चार हायवा उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार व तलाठी पथक चिमूर यांनी पकडून हि कार्यवाही केली. हायवा क्र. MH-27 BX1639, MH-36 AA 2833, MH-40 BG 0590 व इतर एक हायवा असे एकून 4 हायवा तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय चिमूर येथे जमा करण्यात आले होते.जमा करण्यात आलेल्या हयावा ट्रक बाबत स्थानिक प्रसार माध्यम प्रतिनिधीनी यांनी माहीती विचारली असता दोन हायवाच्या चार ब्रास रायल्टीची माहिती देण्यात आली. मात्र चारही हायवामध्ये 6 ब्रास रेती होती असे दिसून आले व उर्वरित दोन हायवांची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. आणि रात्री पकडलेल्या चारही हायवा वाहणास भल्या पहाटेच्या सुमारास तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालयातून कारवाई न करताच सोडून देण्यात आले असल्याने यात स्थानिक प्रशासनावर शंका घेतल्या जात आहे. या सर्व प्रकाराची निपक्ष सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अवैध रेतीच्या चारही हायवा मध्ये किती ब्रास रेती होती व चारही हायवांची रॉयल्टी किती ब्रासची होती, चारही हायवांमधील अवैध रेतीचा साठा कुठे जमा केला. याची सर्व चौकशी करण्यात यावी व काही त्रुटी आढळल्यास संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाही करण्यात यावी तसेच तहसील कार्यालय चिमूर परिसरात शासकीय कामावरच अवैधरित्या रेती टाकली जात असून त्याची साठवनुक करून शासकीय कामावरच वापरली जात आहे. चिमूर तहसील कार्यालयाच्या आवारात अक्षरशः CCTV कॅमेरे असतांना देखील असा प्रकार सुरु असल्याने जनता कुठल्या न्याय दात्याकडे दाद मागेल? आणि हाच सर्व प्रकार चिमूर तालुक्यातील सर्व शासकीय कामावर सुरु आहे. व संपूर्ण चिमूर तालुक्यात अवैध रेतीचा उपसा केला जात आहे तरी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री व चिमुर विधानसभेचे आमदार यांनाही पाठविणात आली आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी देण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!