तालुका स्तरीय बालक्रिडा स्पर्धेत लावण्याचे सुयश;




तळोधी (बा.) प्रतिनिधी:
     तालुका स्तरीय बालक्रिडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोंड येथे नुकत्याच पार पडल्या असुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनकापूर येथिल विद्यार्थिनी लावण्या संतोष नक्षीने हीने प्राथमिक विभागात १०० मिटर धावणे या वैयक्तिक स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर प्राथमिक विभाग सांघिक खेळात रिलेरेस स्पर्धेत मुलींनी द्वितीय क्रमांक पटकावला.  माध्यमिक विभाग सांघिक खेळात रिलेरेस स्पर्धेत मुलींनी द्वितीय क्रमांक  पटकावला आहे. प्राविण्य प्राप्त विद्यार्थांना मार्गदर्शक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक यशवंत कामडी, राजकुमार पाटील, दिवाकर सोनुले,यशुदास ढोरे, शितंल माटे,विद्या झगेकर, या सर्वं शिक्षकांनी मोलाचे सहकार्य लाभले. प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचे शाळा समितीचे अध्यक्ष समशेर सिंग जुनी, उपाध्यक्ष देवता सुर्यवंशी, राहुल रामटेके, चंद्रशेखर अलोने, आशिष गणविर, बेबी बोरकर, रिना मेश्राम, संध्या सहारे,मोहन जाभुंळे, इंद्रजित गावतुरे, आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!