नागपूर विभागीय कृषी सहसंचालकांची कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रकल्पास सदिच्छा भेट

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे नागपूर यांनी कांचनी फार्मर प्रोड्युसर चिनोरा येथील कंपनीला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या बाबत चर्चा केली तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्वयंपूर्ण कशा होतील याबाबत मार्गदर्शन केले.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय तसेच ग्रामीण परिवर्तन  (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत बाजार संपर्कवाढ उप प्रकल्प मध्ये वरोरा तालुक्यातील शेगाव कृषी मंडळ अंतर्गत येत असुन चिनोरा येथील कांचणी शेतकरी उत्पादक कंपनी यांनी जिनिंग व प्रेसिंग युनिट उभारणी करून परिसरातील ८००० ते १०००० शेतकऱ्यांना कापूस बाजारभाव मध्ये हमी देण्याचे कार्य केलेले आहे कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या जिनिंग प्रकल्पाची संपूर्ण पाहणी करून स्मार्ट प्रकल्प अंतर्गत यशस्वीपणे सुरू असलेला महाराष्ट्रातील पहिला व एकमेव प्रकल्प असल्याचे समाधान  उमेश घाटगे यांनी व्यक्त केले.तसेच शेतकरी गटांनी नवीन पोकरा प्रकल्प अंतर्गत कसे प्रकल्प राबवता येईल याबाबत शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधी सोबत चर्चा केली यावेळी त्यांचे सोबत कृषी उपसंचालक, चंद्रपूर चंद्रकांत ठाकरे,वरोरा उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिनखेडे व तालुका कृषी अधिकारी रवी राठोड  उपस्थित होते.यावेळी कांचनीचे संचालक यशवंत सायरे यांनी भारताचे संविधान हे पुस्तक देऊन विभागीय कृषी सहसंचालक यांचे स्वागत केले कांचनीचे संचालक बळीराम डोंगरकर, नितीन टोंगे व व्यवस्थापकीय संचालक बालाजी धोबे व शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!