सोनापूरच्या चिमुकल्या महिन्याभरापासून बेपत्ताच - पोलीस व बाल संरक्षण विभागाच्या शोधकार्यास अपयश

   

सावली (विजय कोरेवार) -

 सावली पोलीस स्टेशन हद्दीतील सोनापूर येथील शिवण्या वय 8 वर्ष व यशिका वय 5 वर्ष या चिमुकल्या मुली वडिलासह 31 डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे मात्र महिना उलटूनही चिमुकल्याना शोधण्यास पोलीस व बाल संरक्षण विभागाला अपयश आले आहे.

       सावली तालुक्यातील सोनापूर येथील मंगेश भांडेकर हा आपल्या चिमुकल्या मुली शिवण्या व यशीका यांना घेऊन 31 डिसेंबर रोजी फरार झाला. मंगेश हा नेहमी दारूच्या नशेत राहत असल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. मंगेश दारूच्या नशेत पत्नी, आई, वडील यांना अनेकदा मारहाण करीत असे. त्यामुळे मागील एक वर्षांपासून पत्नी आशा मंगेश भांडेकर ही चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथे मुलींसह माहेरी राहत होती. मात्र मोठ्या मुलीची शाळा असल्याने ती आजी आजोबाकडे सोनापूर येथे राहत होती. आई रोवणीच्या कामाला तेलंगणा येथे गेली असता लहान मुलीला घेऊन आला व 31 डिसेंबरला दोन्ही मुलींना घेऊन बेपत्ता झाला आहे. सुरुवातीला आजी आजोबा यांनी सावली पोलीस स्टेशनला तक्रार दिली मात्र या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्याने मुलींची आई आशा मंगेश भांडेकर हिने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालयात सदर तक्रार दिली. आठवड्याभरात गावातील काही महिला रामटेक येथे देव दर्शनाला गेले असता तिथे मुलींसह मंगेश आढळला असल्याची माहिती पोलिसांना दिली असता सावली पोलीस आजोबांना घेऊन रामटेक गाठले मात्र तिथे पता लागला नाही. आई व नातेवाईक स्वतः शोध घेतांना दिसत आहेत. बाल संरक्षण अधिकारीही आम्ही शोध घेत असल्याचे सांगतात मात्र सदर विभागाचे अधिकारी एकदाही कुटुंबियांची भेट घेऊन प्रकरण जाणून न घेतल्याने त्यांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महिना लोटूनही मुलींचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत तर प्रशासनाच्या शोधकार्याला अपयश आलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!