अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करणाऱ्या पटवाऱ्याला धक्काबुक्की
शेगाव पोलिसात तक्रार दाखल
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - कमी वेळात जास्त पैसा कमवण्यासाठी सगळीकडे स्पर्धा लागली असून यामध्ये आता रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सरसावले आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे भद्रावती तालुक्यात अवैद्यरित्या रेती व्यवसाय करणाऱ्यावर अंकुश लावण्यासाठी तहसीलदार राजेश भांडारकर ॲक्शन मोडवर आहे. गुरुवार सकाळी साडेनऊ वाजता पटवारी अनंत गीते यांना गोपनीय माहिती मिळाली असता अवैद्यरित्या रेतीची ट्रॅक्टर द्वारे वाहतूक सुरू असतांना रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत असताना पटवाऱ्याला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या ट्रॅक्टर मालकाची तक्रार पटवारी संघटनेतर्फे शेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. सदर ट्रॅक्टर मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पटवारी संघटनेने केली आहे. सदर घटना भद्रावती तालुक्यातील कारेगाव गावाजवळ घडली. गुप्त माहितीच्या आधारे पटवारी अनंत गीते यांनी आपले सहाय्यक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे यांच्या सहाय्याने कारेगाव गावाजवळ रेतीने भरलेले ट्रॅक्टर अडवून विचारपूस करून परवाना मागितला. परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता दोन अज्ञात व्यक्तींनी पटवारी गीते यांना धक्काबुक्की करून रेतीने भरलेले ट्रॅक्टर घेऊन पळ काढला याची माहिती प्रथम भद्रावती येथील तहसीलदारांना देण्यात आली तसेच शेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात धक्काबुक्की करणाऱ्या इसमांच्या विरोधात तक्रार करण्यात आलीया इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व पुढे अशा घटना घडू नये यासाठी उपाय करावे अशी मागणी पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजुरकर यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!