जिल्हा परिषद पूर्व माध्यामिक शाळा सेंद्री बू येथे सेवा निवृत्ती कार्यक्रम सोहळा संपन्न
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.31/01/2025 रोज शुक्रवारला जि. प. पूर्व. माध्यामिक शाळा सेंद्री बू येथे प्रभाकरजी मेश्राम, उच्च श्रेणी मुख्या. सेंद्री बू व मुरलीधरजी जिभकाटे स. शि. सेंद्री बू यांचे सेवा निवृत्ती चे कार्यक्रम केंद्र पिंपळगाव व ग्राम पंचायत कार्यालय सेंद्री बुज यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ. दिपिकाताई दिपकजी कोरे सरपंच सेंद्री बू ह्या लाभल्या, तर प्रमुख अतिथी तं मु स अध्यक्ष बापूलालजी थेर, उपसरपंच श्रीपतजी मरघडे, ग्रामपंचायत अधिकारी सौ ममता बडवाईक मॅडम, ग्राम पंचायत सदस्य लीलाधर बांन्ते,संजय चोपकर,ललिता नागपुरे,चेतना गरपडे, संध्या नागरिकर,ताराबाई धारगावे प्रकाश आंबेकर ग्रापंचायत कर्मचारी, मनोज डहारे संगणक परिचालक ,अनिल जांभुरे युवा कौशल्ये कर्मचारी, अमोल येटरे ग्रामरोजगार सहायक पिंपळगाव केंद्रातील सर्वशिक्षकवृंद, शिक्षिका, प्रतिष्ठित नागरिक, निमंत्रीत पाहूनेमंडळी या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागरिकर सर यांनी केले. तर प्रास्तविक शिक्षकांचे लाडके केंद्रप्रमुख कावरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन नंदूजी बिलवने सर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!