शाळेने शिक्षणाबरोबरच खेळाला प्राधान्य द्यावे - संजयकुमार वासनिक

अषित प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२८/०१/२०२५
शाळेने शिक्षणाबरोबरच खेळाला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन पवनी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक यांनी दि.२७ जानेवारी ला अषित प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.स्थानिक मंगळवारी वार्डातील अषित प्राथमिक शाळा येथे तीन दिवसीय विद्यार्थी,शिक्षक व पालक यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी संतोष धांडे, प्रमुख अतिथी, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विद्याताई मोटघरे,सामाजिक कार्यकर्ते राजेश तलमले, माजी नगरसेविका वंदना नंदागवळी,मुख्याध्यापक राकेश बिसने यांनी दीप प्रज्वलन व माल्यार्पण केले.शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व नृत्य सादर केले.यावेळी शाळेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राजेश तलमले यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोषाध्यक्ष भिमराव वाहाने यांनी स्वयंस्फूर्तीने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णकृती प्रतिमा शाळेला भेट दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अशोक गिरी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शिक्षक प्रयागराज भोयर, मुरलीधर जीवतोडे,नक्षीता खोब्रागडे,शालेय विद्यार्थी व पालक वर्ग यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!