"विद्यार्थ्यांनी अंगी विज्ञाननिष्ठा बाळगावी" - दीपक गरुड
स्नेहसंमेलनात संगणक कक्ष व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२४/०१/२०२५ आजचे युग हे विज्ञानाचे युग असून विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकायचे असेल तर विज्ञाननिष्ठा अंगी बाळगावी असे प्रतिपादन पं.स.चे गट विकास अधिकारी दिपक गरुड यांनी दि.२३ जानेवारीला सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या भव्य प्रांगणात स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष भिमराव वाहाने,प्रमुख अतिथी गट शिक्षण अधिकारी शरदचंद्र शर्मा, म.ग्रा.वि.शि.संस्थेचे सदस्य विवेक खोब्रागडे, शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक, प्रशासन अधिकारी आरिफ शेख, मुख्याध्यापिका सुजाता गजभिये,मुख्याध्यापक राकेश बिसने,सेवानिवृत्त शिक्षक दिवाकर गोवर्धन, यांनी दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन व संगणक कक्ष तथा विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन गटविकास अधिकारी दिपक गरुड यांनी केले.यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे स्वागत गीत व नृत्य सादर केले. मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती व भविष्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने आपण कटिबद्ध आहोत असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी शरदचंद्र शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे स्नेहसंमेलनातून शिक्षक, पालक, विद्यार्थी व प्रशासन यांच्यात गोडवा निर्माण होतो.न.प.पवनीचे प्रशासन अधिकारी आरिफ शेख यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाच्या प्रत्येक स्पर्धेत व उपक्रमात भाग घेण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष भिमराव वाहाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, स्नेहसंमेलनामुळे शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतात.दोन दिवसीय स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक,बौद्धिक व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अशोक गिरी व अरुणा कांबळे तर आभार प्रदर्शन हर्षा तलवारे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी सानिया शेख व गौरव नागपुरकर,शिक्षक,पालक व आमंत्रित पाहुणे तथा विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सिद्धेश्वर फड,संदीप मुंडले,विरेंद्र मेश्राम, प्रयागराज भोयर,मुरलीधर जीवतोडे,नीता मोटघरे, हर्षा तलवारे,भावना निमजे,अर्चना दडवे, संगीता ढेंगरे,प्रतिभा रामटेके,भारती बोरकर यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!