वरोरा तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या
युवासेनेच्या तालुका अध्यक्षाचे आमदार तथा समिती प्रमुख शिवसेना उपनेते नरेंद्रजी भोंडेकर यांना दिले निवेदन
वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - वरोरा तालुक्यात हजारो शिक्षित युवक बेरोजगार आहे. याठिकाणी दोन वीज निर्मिती प्रकल्प असून एकोना कोळसा खाण सारखे उद्योग प्रस्तापित आहे. परंतु बाहेर राज्यातील लोकांना कंपनी व्यवस्थापन रोजगाराची संधी उपलब्ध करून देतात. परंतु स्थानिकांना हेतूपूरस्पर डावलल्या जात असल्यामुळे तालुक्यात बेरोजगाराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारीचा धागा पकडून वरोरा तालुक्याचे युवासेना अध्यक्ष यांनी तालुक्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार साधन निर्मिती करून बेरोजगारी दूर करावी. अशा आशयाचे निवेदन विद्यमान आमदार तथा समिती प्रमुख शिवसेना उपनेते नरेंद्रजी भोंडेकर यांना निवेदन दिले आहे.वरोरा तालुक्यात युवासेनेच्या विचारधारेशी हजारो युवक जुळले असून युवकांच्या हाताला काम मिळावे. स्थानिक उद्योग कंपन्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. युवासेना संघटनमध्ये आज 833 युवक बेरीजगार आहे. पक्षाचे संघटन मजबूत करून ते वाढवायचे असेल तर आर्थिक पाठबल आवश्यक आहे. याअनुषंगाने कार्यकर्त्यांना कुठला तरी रोजगार हवा आहे.यासाठी वरोरा तालुका युवा प्रमुख आणि सचिव यांनी आमदार तथा समिती प्रमुख शिवसेना नरेंद्रजी भोंडेकर यांना गळ घालून निवेदन सादर केले आहे. निश्चितच ते युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवितील असा आशावाद तालुका युवा प्रमुख प्रणव पारेलवार आणि सचिव रितिक जाधव यांनी व्यक्त केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!