येन्सा येथील अपघातात मूत्युंमुखी महिलाच्या वारसाना 5 लाखाची आर्थिक मदत करा - तुलसी अलाम
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा शहरातील बावणे लेआऊट व काॅलरी वॉर्डातील जवळपास 15 महिला रामपूर येथील एका शेतमालकाच्या शेतात ऊसतोडणी साठी गेल्या असता काम आटोपल्यानंतर एम एच 34 डी 4515 या क्रमांकाच्या आटोने वरोरा कडे येत असताना त्याच मार्गाने एम एच 31ए एम 8313 क्रमांकाचे आर्टिका वाहनातून भंतेजी मूल येथे धम्म परिषदेला जात असता आर्टिका कारने नागपूर चंद्रपूर महामार्गवरील येन्सा गावाजवळ वळणावर मजुरांच्या आटो वाहनाला जबर धडक दिली या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून १३ महिला व दोन भंतेजी जखमी झाले.
जखमी महिलांपैकी 9 महिलांना चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले असून 4 महिला आणि दोन भंतेजी यांचेवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.मृतक महिलांचे नाव रंजना चंद्रकांत झुंनझुनकर वय 46, सविता अरविंद बुरटकर वय 42,रा. बावणे ले आऊट वरोरा असे आहे.जखमीमध्ये मंजुषा प्रकाश दडमल वय 31,अलका महादेव अंबाडे वय 49,सविता भास्कर झाडे वय 33,प्रेमीला बालाजी उईके वय 40,सुरेखा प्रफुल आत्राम, मंगला गोविंद गभणे वय 40 ह्या महिला गंभीर जखमी आहे.दोन्ही वाहनांच्या चालकांना वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
आर्थिक परिस्थिती असल्याने पोटाची खळगी भरणे कठीण होत असते. त्यामुळे मजुरी करण्याशिवाय पर्याय नसतो.वरोरा शहरातील बावणे ले आऊट व कॉलरी वॉर्डातील महिलांचा समूह खांबाड्याजवळील रामपूर येथे एका शेतमालकाचे शेतात ऊस तोडणी कामासाठी जात होतें. काम आटोपल्या नंतर परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर मजुरांच्या आटोला कार ची धडक यामध्ये दोन महिलांचा मृत्यू आणि इतर गंभीर जखमी झाले. त्यामुळे सदर महिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृतक महिलांचे कुटुंबाला 5 लाखाची आर्थिक मदत करा असे तुलसी अलाम यांनी मा. आमदार करणं देवतळे यांच्याकडे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!