चंद्रपूरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम!

चंद्रपूरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम!

नविन चंद्रपूर परिसरात म्हाडाने दिलेल्या 16 एकर जागेवर, 137 कोटी रूपये खर्चुन भव्य स्टेडियम बांधण्यात येणार आहे. वीर बाबुराव शेडमाके यांचे नांवाने हे आतंरराष्ट्रिय स्टेडीयमचे काम लवकरच सुरू होईल अशी माहीती माजी पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपूर येथे सुरू असलेल्या एका आंदोलनास त्यांनी भेट दिली, त्यावेळी, आपण आता मंत्री नसल्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील विकास कामाना ब्रेक मिळेल अशी चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांना भिती आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावेळी दिलेल्या ​उत्तरात मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयात होवू घातलेल्या आंतरराष्ट्रिय स्टेडीयमची माहीती दिली.

क्रिडामंत्री नामदार भामरे यांचेशी आपले जवळचे सबंध आहेत, त्यामुळे 137 कोटी रूपये खर्चुन होणार्या वीर बाबुराव शेडमाके स्टेडीयमला अडचणी येणार नाही असे मुनगंटीवार यांनी विश्वास व्यक्त केला.  नवीन चंद्रपूर येथे म्हाडाने 16 एकर जागा या स्टेडीयम करीता मोफत दिली आहे.  म्हाडाने एखाद्या प्रकल्पाकरीता मोफत जागा देण्यांची पहीलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगीतले.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे स्टेडीयम राहणार आहे.  या स्टेडीयमला 1857 चे शहीद, आदीवासींचे प्रेरणास्थान वीर बाबुराव शेडमाके यांचे नांव दिले जाणार आहे.  तसा प्रस्ताव पुणे येथे क्रिडा संचालनालय यांना पाठविण्यात आला असल्यांचे मुनगंटीवार यांनी सांगीतले.

मागील काही वर्षापासून मिशन आॅलम्पीक अंतर्गत जिल्हयात क्रिडा संकुलाचे बांधकाम, खेळाचे आधुनिक साहित्य यावर भर दिला जात असून, जिल्हयात खेळाला उत्तम संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!