प्रकल्पग्रस्तांना चोरट्याचा त्रास आदिवासी प्रकल्प ग्रस्त कुटुंबांना 29 हजाराचा आर्थिक फटका

प्रकल्पग्रस्तांना चोरट्याचा त्रास 
आदिवासी प्रकल्प ग्रस्त कुटुंबांना 29 हजाराचा आर्थिक फटका 


राजुरा/प्रतिनिधी 

भेंडाळा प्रकल्पात बेरडी गाव संपादित झाल्याने त्यांचे पुनर्वसन शासनाने बामनवाडा येथे केले. असे असताना आता प्रकल्पाच्या कामाची गती वाढविण्यासाठी शासन प्रकल्प ग्रस्तांना बेरडी गाव खाली करा म्हणून शासन त्याना नोटिसा पाठवीत आहे असे असताना प्रकल्प ग्रस्त पुनर्वसनाच्या ठिकाणी आता घरे बांधणे सुरू केले असून काही प्रकल्प ग्रस्तांचे घर पूर्णत्वास आले आहे.  बांधकाम केलेल्या घरी विद्युत जोडणी साठी वायरिंग करणे आवश्यक आहे. सुदर्शन सिताराम तोडासे या प्रकल्प ग्रस्ताने घराचे बांधकाम करुन विद्युत जोडणीसाठी वायरिंग केली मात्र रात्री चोरट्यांनी 29 हजारची केलेली संपूर्ण वायरिंग दिनांक 23/12/2024 ला रात्रौ चोरून नेली यामुळे प्रकल्प ग्रस्तांना आता चोरीच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. याची तक्रार सुदर्शन तोडासे यांनी दिनांक 25/12/2024 ला पोलीस स्टेशन राजुरा येथे दिली मात्र तीन दिवस तक्रारीला होवून सुध्दा पोलीस विभाग साधी विचारपूस करण्यासाठी पुनर्वसन ठिकाणी आले नाही यामुळे प्रकल्प ग्रस्त आता मानसिक त्रासात आहेत. प्रकल्प ग्रस्तांना पोलिसांची साथ मिळेल काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!