तळोधी पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिरात 69 रक्तदात्यांनी केले रक्तदान

तळोधी पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिरात 69 रक्तदात्यांनी केले रक्तदान
यश कायरकर:
 तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी, परिसरातील पत्रकार आणि परिसरातील नागरिकांनी मिळून या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस स्टेशन येथे येऊन रक्तदान केले. यावेळेस परिसरातील एकूण 69 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर पोलीस विभागाच्या 'रायझिंग डे' निमित्ताने घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये संकलन करण्यात आलेले रक्त हे 'जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर' या रक्त पेटीला पुरविण्यात आले.
      या रक्तदान शिबिराचे आयोजन पोलीस विभागाने केले तर या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी श्री खोचरे साहेब ब्रह्मपुरी यांनी केले. तर यावेळेस अध्यक्ष म्हणून खोजरामजी मरस्कोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य हे होते. या शिबिरा तील रक्तदात्यांना एक बॅग आणि स्वीट पाकिट, तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे तळोदी बालापुर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संगीता हेलांडे मॅडम यांनी मनपूर्वक आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!