दोन वाघाच्या झुंजीत एक वाघ गंभीर जखमी

दोन वाघाच्या झुंजीत एक वाघ गंभीर जखमी
 (वन विभागाचे शोध मोहीम सुरू परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा)
यश कायरकर:
  नागभीड वनपरिक्षेत्रातील वासाडा मक्ता या परिसरामध्ये आज सकाळी ग्रामीण लोकांनी पाहिलेल्या दोन वाघाच्या लढाईमध्ये  एक वाघ गंभीर जखमी झाल्याचे लोकांनी वन विभागाला कळविले. असता वन विभागाने घटनास्थळ गाटून मोका चौकशी केली असता घटना स्थळी मोठ्या प्रमाणात  रक्त विखुरलेला आढळल्याने वनविभागाने त्या परिसरात जखमी वाघाला शोधण्याकरता शोध मोहीम राबवलेली असून. वाघ जखमी असल्याने परिसरामध्ये कोणतीही जीवित हानी होऊ शकते म्हणून कोणीही वाघाच्या मागे किंवा जंगलामध्ये प्रवेश करू नये, भटकू नये. असा वन विभागाने संपर्कतेचा इशारा दिलेला आहे.
  कोणतीही जीवित हानी होऊ नये व जखमी वाघ तात्काळ मिळावा याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहे ही घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील ७५६ कक्ष क्रमांक मधील आज सकाळी लोकांनी डोळ्यांनी पाहिले यामध्ये दोन वाघाची झुंज यात एक वाघ गंभीर असल्याचे लोकांनी सांगितले त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!