सिदेवाही वनपरिक्षेत्र मध्ये मृत्यू अवस्थेत आढळला वाघ नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला मृत्यू
सिदेवाही वनपरिक्षेत्र मध्ये मृत्यू अवस्थेत आढळला वाघ
यश कायरकर:
आज दि. 02.01.2025 रोजी बिट वनरक्षक, सिंदेवाही हे सिंदेवाही वनपरिक्षेत्र उपक्षेत्र सिंदेवाही, नियतक्षेत्र सिंदेवाही मध्ये नियमित सकाळची गस्त करीत असतांना मौजा लाडबोरी शेतशिवारातील श्री. रमेश पांडूरंग गंडाईत रा. सिंदेवाही यांचे मालकीचे शेत सर्व्हे क. 343 ला लागुन असलेल्या सरकारी नाल्याजवळ वाघ मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले. सदर माहिती प्राप्त होताच शिंदे बाईचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर हे क्षेत्र सहायक, श्री. एन. टी. गडपायले, वनरक्षक श्री. फुलझले व अधिनिस्त कर्मचारी तसेच आर.आर.यु. सिंदेवाही वनकर्मचा-यांना घेवून मौकास्थळी पोहचले. सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना कळविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर श्री. राकेश सेपट,भा.व.से. उपवनसंरक्षक ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी, एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक, (प्रादे. व वन्यजीव), ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी , श्री. महेश गायकवाड, सहायक वनसंरक्षक, (तेंदू), ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी, डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, (वन्यजीव) TATR चंद्रपुर, चंद्रपुर NTCA चे प्रतीनिधी श्री. बंडु धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) चे प्रतिनिधी श्री. मुकेश भांदककर, NGO स्वॉब नेचर केअर फॉन्डेशन चे अध्यक्ष श्री. यश कायरकर, स्वाब चे बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, छत्रपती रामटेके, RRT टीम चंद्रपुर, श्री. राकेश अहुजा, जीवशास्त्रज्ञ, ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी, डॉ. सुरपाम, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, सिंदेवाही, डॉ. शालीनी लोंढे, पशुवैद्यकीय अधिकारी, सिंदेवाही डॉ. बजरंग सावरे, पशुवैद्यकीय अधिकारी, पेटगांव यांचे उपस्थितीत मृत वाघाचे निरिक्षण व शव विच्छेदन करण्यात आले. सदर मृत वाघ (नर) अंदाजे 14 ते 15 वयाचा वयोवृध्द असल्याचा व वाघाचा मृत्यू हा दहा ते बारा दिवसांपूर्वी झालं असल्याचे व वृद्धकाळाने व वाघाचे संपूर्ण अंग, दात व नखे, मिशी शाबूत असल्याने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे प्राथमिक निरिक्षणावरून दिसुन आले.
वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे उपस्थितीत पंचासमक्ष मौका पंचनामा नोंदविण्यात आला. त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी यांचेकडून घटनास्थळी शवविच्छेदन करून उत्तरिय तपासणी करीता विसेरा घेण्यात आले व घेतलेला विसेरा पंचासमक्ष पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सिलबंद करून दिला. पंचनामा, शवविच्छेदन व इतर संपुर्ण कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर सदर मृत वाघाचे वरिल सर्व अधिकारी व पंचासमक्ष घटनास्थळावरच दहन करण्यात आले. सदर घटनेबाबत श्री. व्ही. पी. फुलझले, वनरक्षक सिंदेवाही यांनी पी. ओ.आर. क. 09126/228143 दि. 02.01.2025 अन्वये वनगुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे. तसेच, सदर मृत वाघाचे घेतलेले विसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असुन त्यांचे अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत नर वाघाचे मृत्यू कशामुळे झाले याचे निदान करण्यात येईल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!