अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या डंपर वर तलाठी पथकाची जोरदार कारवाई

चिमूर तहसीलला वाहन जप्त 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या ट्रॅक्टर तसेच हयावा ट्रक द्वारे सर्रास रेतीची वाहतूक केली जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून तहसीलदार तथा तलाठी पथक सज्ज झाले असून दिनांक.२६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०२:३० वाजताच्या सुमारास चिमूर तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर भरधाव वेगाने जाणाऱ्या १० चाकी डंपर वाहन क्रमांक.एम एच ४० एन ६२२१ यावर तहसीलदार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी प्रसाद घोडघासे, उमेश पाटील, शुभम बदकी,स्वप्नील उमरे, प्रितेश ठाकरे, प्रितम चिडे यांच्या सयुक्त पथकाने मिळून हि कारवाई केली.व तहसील कार्यालय चिमूर येथे वाहन जप्त करण्यात आले.या वाहन मालकाचे नाव गौतम पाटील राहणार गुजगवान असे आहे तर चालकाचे नाव साहिल जांभुळे राहणार चारगाव असे असून हि मोहिम नेहमीच सुरु राहणार असल्याने सध्याच्या स्थितीमध्ये रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!