अवैधरित्या मुरूमाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर तलाठी पथकाची जोरदार धडक कारवाई
चिमूर तहसीलला दोन्ही ट्रॅक्टर जप्त
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.२६ जानेवारी २०२५ ला रात्री ११:०० वाजताच्या सुमारास २ ट्रॅक्टर विना क्रमांकाचे अवैधरित्या मुरूम व कलई ने भरलेले नवेगाव रामदेगी रस्त्याने वाहतूक करतांना तलाठी पथकाने तहसीलदार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी प्रसाद घोडघासे, उमेश पाटील, प्रितेश ठाकरे, प्रितम चिडे यांनी सयुक्त रित्या कारवाई केली व तहसील कार्यालय चिमूर येथे विना क्रमांकाचे दोन्ही ट्रॅक्टर जप्त केले. वाहन चालकाचे नाव डूलेश्वर नाटके तसेच दिवाकर दडमल असे असून दोन्ही ट्रॅक्टर एकाच मालकाचे आहे. मालकाचे नाव टोमेश नाटके असे आहे.अशाप्रकारे नदी,नाले, जंगलातून, मोठ्या प्रमाणावर रेती तथा मुरुमाची वाहतूक दैनंदिन दिवस रात्र सुरु असल्याने महसूल पथक सज्ज झाले आहेत. यामुळे अशाप्रकारे अवैधरित्या शासनाचा महसूल चोरीला जात असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र तहसीलदार यांची धाडसत्र मोहिम तसेच तलाठ्यांची गस्त सुरु झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!