अखेर राजोली चक गावाचा बोथली साज्यात समावेश - तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहने यांच्या पाठपुराव्याला यश

अखेर राजोली चक गावाचा बोथली साज्यात समावेश - तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहने यांच्या पाठपुराव्याला यश 

सावली  :- सावली तालुक्यातील मौजा राजोली चक नं. १ व राजोली चक नं. २ हे दोन्ही गावे राजोली चक नावाने एकच महसुली गाव आहे.राजोली चक हे गाव तलाठी साजा पुर्नरचने अगोदर तलाठी साजा बोथली या साजात समाविष्ठ होते.नवीन साजा निर्मितीमध्ये राजोली चक हे गाव बोथली साजा मधून कमी करून नव्याने निर्मित चक विरखल या साजामध्ये समाविष्ठ करण्यात आले.

परंतू मौजा राजोली चक हे गाव चक विरखल साजा मुख्यालयापासून १५ कि.मी. अंतरावर असल्याने तसेच हा परिसर घनदाट जंगल व्याप्त असून वन्यजीवांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे व वाहतुकीचे साधन कमी असल्याने या भागात आधीच भीतीचे वातावरण पसरले होते,तसेच पुर्वीचे बोथली साजा २ ते ३ कि.मी. अंतरावर असल्याने शेतकऱ्यांना त्रासदायक असल्याने संबंधीत गावाचा बोथली या साजामध्ये समावेश करण्यात यावा अशी  मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली, ही माहिती मिळताच तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर व तत्कालीन राज्याचे विरोधी पक्षनेते, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे राजोली चक गावाचा बोथली साज्यात पूर्ववत समावेश करण्याबाबत वारंवार प्रयत्नशील राहिले

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महसूल सचिव मुंबई व शासन दरबारी लावली होती, आज त्यांचा पाठपुराव्यामुळे व सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांच्या प्रयत्नातून राजोली चक गावाचा बोथली साज्यात पूर्ववत समावेश करण्यात आला,यावेळी गावकऱ्यांनी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे व तालुका अध्यक्ष नितीन गोहने आभार मानत शासन निर्णयाचे स्वागत केले आहे.

तसेच जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांचे  पत्र संदर्भ क्र. 6 अन्वये मौजा राजोली चक न. 1 व चक नं. 02 ता. सावली ही गावे तलाठी साझा विरखल ऐवजी तलाठी साझा बोथली मध्ये समाविष्ठ करणेसाठी प्रस्ताव सादर करणेस आला होता. संदर्भ क्र. 7 अन्वये उप सचिव यांचे पत्र प्राप्त झाले आहे.सदर पत्राच्या मुद्या क्र. 04 अन्वये सबंधित जिल्हाधिकारी यांना कार्यक्षेत्रासाठी विहीत केलेल्या रीतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या आदेशाव्दारे/अधिसूचनेव्दारे साझा किंवा मंडळामध्ये बदल करण्याचे अधिकार आहेत.

 सदर प्रस्तुत प्रकरणी मौजा- राजोली चक नं. 1 व राजोली चक नं. 2 ता सावली, जि. चंद्रपूर ही गावे तलाठी साझा विरखल ऐवजी तलाठी साझा बोथली मध्ये पुर्ववत समाविष्ठ करणेबाबत निर्णय घेण्यास जिल्हाधिकारी, चंद्रपूर सक्षम आहेत." असे महसूल सचिव मंत्रालय मुंबई यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना कळविले होते.त्यांनुषागणे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी तहसीलदार सावली यांना प्रस्तावित गावचा समावेश करण्याबाबत सूचना केल्या आहेत. साझा पुनर्रचनेच्या अनुषंगाने विषयांकित गावांची माहिती  7/12, खातेदार, क्षेत्र व इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्यात आला होता.सोबत दोन साझांचा सद्याचा एकत्रित नकाशा तसेच संभाव्य बदलानुसार होणारा प्रस्तावित नकाशा प्रकरणात संलग्न करण्यात आले होते.

   सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश आल्याचे पाहून आज गणराज्य दिनाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने यानाई सत्कार केला. यावेळी गावचे सरपंच सतीश नंदगिरवार, माजी सरपंच शामराव पाटील बाबनवाडे, गावचे पोलीस पाटिल बंडू बाबणवाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरकर, प्रदीप कोरडे, संजय रोहनकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गोरखनाथ झाडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन आगलावे सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!