मुंडाळा येथे मिळते रोजगाराची हमी स्थलांतर झाल कमी ! मनरेगा दिले बळ... विवेक जॉन्सन सीईओ जि.प. कडूनही कार्याची दखल
मुंडाळा येथे मिळते रोजगाराची
हमी स्थलांतर झाल कमी !
मनरेगा दिले बळ... विवेक जॉन्सन सीईओ जि.प. कडूनही कार्याची दखल
रोजगाराअभावी संपूर्ण तालुक्यातून मजुरांचे राज्यात व परराज्यात स्थलांतर होत आहे. मात्र, त्या गावच्या ग्रामसभेने नागरिकांना गावातच 'रोजगाराची हमी दिली आहे. काही ठराविक दिवसच नाही तर अगदी बाराही महिने रोजगार देऊन ते गाव तालुक्यात मैलाचा दगड ठरले आहे. इतर गावांनीही या गावचा आदर्श घेऊन आखणी केली तर त्या गावांमध्येही रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या परिसराचा कायापालट करण्यासाठी गाव एकत्र आले तर कसा चमत्कार घडतो, हे सावली तालुक्यातील मुंडाळा येथील ग्रामसभा व ग्रामपंचायतीने सिद्ध करून दाखविले आहे. वनहक्क क्षेत्रातील २५ हेक्टर परिसरात तब्बल २५ हजार फळझाडे लावून संगोपन केल्याने ही फळझाडे नागरिकांसाठी लक्षवेधी ठरली आहेत. सामूहिक वनहक्क क्षेत्रातील एकूण १९०.९८ हेक्टर २०१७ मंध्ये दावा प्राप्त झाला. *तीन कोटीपेक्षा अधिकची कामे*
"सामुहिक वनहक्क क्षेत्रात फळबाग निर्मितीसाठी नरेगा अंतर्गत कामे सुरू असून मागील ३ वर्षापासून सतत काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. फळबागेत आंबा, पेरू,सीताफळ ,फणस, काजू, लिंबू, आवळा, शेवगा, जांभूळ इ. औषधी वनस्पति अर्जुन, कळंब, बेहडा,करंजी , चिंच, लिंबू, सिसू, अमलतास, पांढरा सीरस,रिठा इ. वृक्षलागवड झालेली आहे. " राजू बोरकर, रोजगार सेवक मुंडाळा.
वनहक्क कायद्याची फलश्रुती
"ग्रामसभेला वनहक्क कायदा २००६ अंतर्गत १९१.५० हेक्टर सामुहिक वनहक्क क्षेत्र प्राप्त झालेले असून सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनासाठी टाटा सामाजिक संस्था ग्रासभेला व्यवस्थापण आराखडा, शिवार फेरी, माहिती फलक, अवजार बँक ची निर्मिती व प्रशिक्षण इ. कामासाठी मारदर्शन करीत आहे. "
नितीन ठाकरे (संशोधन अधिकारी) टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई
सदर क्षेत्राच्या विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आय.सी.आय.सी.आय. यांच्या अभिसरणातून ग्रामसभा मुंडाळा येथे २०२२-२३ मध्ये १२ हेक्टर क्षेत्रावर ११ हजार फळझाडे लागवडीचा निर्णय झाला. २०२४-२५ पासून टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई (TISS) व मनरेगा च्या सहकार्याने यंदा १४ हजार फळझाडांची लागवड करून संगोपन काम सुरू आहे.
गावांतील सरासरी २०० पेक्षा अधिक जॉब कार्ड धारक १०० पेक्षा अधिक दिवस काम मिळत असून सरासरी ९० पेक्षा अधिक कुटुंबाला बाराही महीने रोजगार प्राप्त होत आहे.
परिणामी गावातील नागरिकांना गावातच काम मिळत असल्या कारणाने स्थलांतर पूर्णत बंद झाले असून, यात महिलांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे गावाची आरोग्य, शिक्षण व आर्थिक परिस्थिती सुधारणा झाली असून हजारो फळझाड व बांबू लागवडीतून पर्यावरण व आर्थिकरित्या गाव समृद्ध होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!