सादागड येथे राजा रावण मूर्ती, सल्लाशक्ती प्रतिष्ठापणा व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न

 सादागड येथे राजा रावण मूर्ती, सल्लाशक्ती प्रतिष्ठापणा व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न 

सावली - तालुक्यातील सादागड येथे आदिवासी समाजाचे दैवत राजा रावण यांची मूर्ती स्थापना व सल्ला शक्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाचा प्रबोधन मेळावा घेण्यात आला.

    रावणाला काही परंपरांमध्ये वाईट किंवा क्रूर म्हटलं जात असलंं तरी एक समाजातील एक मोठा भाग रावणाची पूजा करतो. आदिवासी समाजात रावणाचा उल्लेख राव, राव पेन, रावूळ, राऊड, रावेन पुरखा असा करत आराध्य मानून पूजा केली जाते. राजा रावणाची मूर्ती स्थापन करणारे जिल्ह्यात सादागड हे एकमेव गाव आहे. आदिवासी समाजाची मातृ, पितृ, शक्ती मानला जाणारा सल्ला गागरा शक्ती स्थळाचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाचे गोंडी नृत्यही सादर करण्यात आले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, उदघाटक थोर गोंडीयन विचारवंत अभ्यासक तथा राष्ट्रीय अध्यक्ष जनसेवा गोंडवाना पार्टी अवचितराव सयाम, मार्गदर्शक गोंडी धर्म भूमक संघाचे राष्ट्रीय सचिव संतोष मसराम, गोंडी धर्म विचारवंत लेखा कोवे, मारोती उईके, संपत कन्नाके, बापूजी मडावी आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जागतिक गोंड सगामांदी शाखा सादागड च्या वतीने कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!