वरोरा तालुक्यात युवासेनेत शेकडो युवकांचा सामूहिक प्रवेश
उप संपादक
विलास मोहिनकर
चंद्रपूर : - वरोरा तालुक्यातील शेकडो युवकांनी एकत्र येत युवा सेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करून राजकीय क्षेत्रात नव्या उमेदीने पाऊल टाकले. प्रणव परेलवार आणि रितिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. या ऐतिहासिक क्षणी युवासेनेचे महाराष्ट्र सचिव शुभम नवले, महाराष्ट्र कार्यकारी सदस्य हर्षल शिंदे, पूर्व विदर्भ निरीक्षक शैलेश केळझरकर, जिल्हा समन्वयक प्रमोद नागोसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रवेश सोहळ्याला वरोरा तालुक्यातील युवकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. आलेख रट्टे यांनी नियोजनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. तालुक्याच्या विविध गावांमधील युवकांनी आपल्या सहभागातून युवासेनेत नव्या दमाचा जोश भरल्याचे दिसून आले. युवासेना तालुकाप्रमुख प्रणव परेलवार आणि तालुका सचिव रितिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. ग्राम पंचायत सदस्य सचिन रामचंद्र उईके यांच्यासह शुभम भोयर, कुणाल बरतलवार, मंथन नेमाडे, अनिकेत भोयर, महेश पवार, प्रफुल वणकर, निखिल कोटांगळे, सागर कपाटे, गोलू पेचे, मयूर चट्टे, विकी ननकटे, मनीष नंदनवार, देवा वैद्य, रुपेश कायरकर, हर्षल भालेराव, सूरज पारखी, सुहास चौधरी, अक्षय अंद्रस्कर, प्रतीक जाधव, मनोज मेश्राम, गौरव बोबडे, मयंक वाघमारे, निलेश मेश्राम आणि वृशभ फोपारे यांचा यामध्ये समावेश आहे.युवासेनेच्या या प्रवेश सोहळ्याने संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून, वरोरा तालुक्यातील युवकांच्या सक्रियतेने स्थानिक राजकीय पटलावर युवासेनेची ताकद अधिक वाढली आहे. सामाजिक आणि राजकीय कार्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास साधण्याचा निर्धार या युवकांनी व्यक्त केला आहे.या सोहळ्यात युवासेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी युवकांना मार्गदर्शन करत संघटनेच्या उद्दिष्टांबद्दल सविस्तर माहिती दिली. शुभम नवले, हर्षल शिंदे, शैलेश केळझरकर आणि प्रमोद नागोसे यांनी युवकांचा उत्साह वाखाणत त्यांना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी काम करण्याचे आवाहन केले.प्रवेश सोहळ्यानंतर वरोरा तालुक्यातील युवासेनेचा विस्तार अधिक बळकट झाला आहे. युवकांच्या या सहभागाने संघटनेला स्थानिक पातळीवर नवे नेतृत्व आणि कार्यकर्ते मिळाले असून, यामुळे भविष्यातील राजकीय दिशा बदलण्याची शक्यता आहे. युवासेनेच्या या नव्या प्रवाहाने वरोरा तालुका राजकीय हालचालींचे केंद्रबिंदू ठरला असून, युवकांच्या सहभागातून विकासात्मक कामांमध्ये गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!