विहरीत उडी घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या




वरोरा...जगदीश पेंदाम

भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावातील अल्पवयीन मुलगा आरोहन माणिक बागेसर याने गावातीलच बाजारवाडी मधील हनुमान मंदिर जवळील सार्वजनिक विहरीत उडी मारून जीवन यात्रा संपवली. 
सविस्तर माहिती अशी की आरोहन हा घरातून बुधवार दि. २२ ला सायंकाळी ६ च्या सुमारास घरून निघून गेला घरून निघून गेल्या कारणांनी मोठा भाऊ व आई यांनी सर्वत्र त्याची शोधाशोध केलीपण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही दरम्यान २ दिवसा नंतर आज दि. २४ डिसेंबर ला गावातीलच विहरीत त्याचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगत असल्याचे गावातील काही मुलांना दिसून आला ही माहिती गावात पसरताच गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात  बगण्यासाठी विहिरी कडे गर्दी केली, घटनेची माहिती भद्रावती पोलीस यांना मिळाल्या नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा  लिहल्या नंतर मृत्यूदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला व उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती येथे पाठण्यात आले आहे. 
३ वर्षा आधी आरोहन च्या वडिलांनी सुद्धा कर्ज बाजारी पणामुळे अशीच विहरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली होती. तेव्हा पासून एकट्या आई च्या भरोशावर कुटुंबाची जबाबदारी आली होती.आई मोलमजुरी करून यांचे पालनपोषण करीत होती. आरोहन च्या अशा एकाकी घेतलेल्या टोकाच्या पावलांमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलेला आहे, घटनेच्या अधिक तपास भद्रावती पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!