जख्मी वाघाने केले शेतकऱ्याला गंभीर जख्मी
जख्मी वाघाने केले शेतकऱ्याला गंभीर जख्मी
यश कायरकर;
ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रातील, रान (परसोडी) परिसरातील मिंडाळा राऊंड, कोसंबी बीटा मधील पारडी (ठवरे) येथील शेतकरी गुरुदेव पुरुषोत्तम सारये (वय 42) शेतकरी आपल्या शेतावर काम करीत असताना परिसरातील वाघाने हमला करून दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान शेतकऱ्यास गंभीर जखमी केले जखमी शेतकऱ्यास ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे संपूर्ण कर्मचारी घटनास्थळावर दाखल होऊन परिसरामध्ये गस्त वाढविली आहे.
*दोन वाघाची झाली होती झुंज जखमी वाघ मोठी शिकार करण्यास असमर्थ.*
चार तारखेला झाली होती दोन वाघाची झुंज त्यातील गंभीर जखमी वाघाने आठ दिवस उपाशी असल्याने माणसावर हल्ला केला असल्याची माहिती या घटनेतून सामने आली आहे. दोन वाघाच्या झुंजीत एक वाघ गंभीर दुखापत ग्रस्त झालेला होता. वन विभाग त्या वाघावर बारीक नजर ठेवून परिसरामध्ये वन विभागाचे कर्मचारी व कार्यकर्ते सतत गस्त घालून परिसरातील शेतकरी व जनतेला सावधानतेचा इशारा देतच आहेत. मात्र शेतकऱ्यांच्याही शेतीचा हंगाम सुरू असल्याने त्यांना शेतावर जाणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातच शेतावर काम करत असलेल्या शेतकऱ्यावर हा स्मरा केल्याने, मोठी वन्यजीवांची शिकार करण्यास असमर्थ असलेला झुंजीतील जखमी वाघाने शेवटी माणसाकडे आपली नजर वाढवून हल्ला चढविला त्यामुळे परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून, "या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा." अशी मागणी परिसरातील जनतेने वन विभागासमोर रेटून धरलेली आहे. व परिस्थिती पाहता या वाघाला तात्काळ जेरबंद करणे गरजेचे आहे. अन्यथा मोठ्या प्राण्यांची शिकार न करू शकल्यामुळे परिसरातील लोकांना टार्गेट करत या संघर्षात वाढ होणारच हे नाकारता येत नाही. वन विभागाची संपूर्ण चम्मू लढाईतील जखमी दोन्ही वाघांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून परिसरात गस्त घालीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!