कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालीन वादविवाद स्पर्धा संपन्न

स्व.मा.सा.कन्नमवार यांच्या१२५ व्या जयंतनिमित्त कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालीन वादविवाद स्पर्धा संपन्न 


   शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचलित, व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे दि.०४ जानेवारी ते १२ जानेवारी, २०२५ दरम्यान क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न होत आहे. दरम्यान दि.१० जानेवारी,२०२५ रोजी संयुक्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.मा.सा.कन्नमवार यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद - विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष ॲड. अनीलजी वैरागडे अध्यक्षस्थानी उपस्थीत होते. प्रसंगी पदवीधर मतदारसंघ नागपूर विभागाचे विधान परिषद सदस्य, माननीय ॲड.अभिजित वंजारी यांनी या महोत्सवाचे उद्घाटन करुण विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.त्यानी शिक्षणं क्षेत्रात होत असलेले बदल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020  यातील आव्हाने व संधी यावर विद्यार्थ्याना सविस्तर असे मार्गदर्शन केले. आपल्या प्रास्ताविकात महोत्सवाच्या मुख्य आयोजक व प्राचार्या डॉ.अनीता वाळके यांनी मोहत्सवाची रूपरेषा व दृष्टीकोन विषद केला, व स्पर्धक विद्यार्थ्याना शुभेच्या दिल्या.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात संविधान सुरक्षित आहे? या विषयावर वाद - विवाद स्पर्धा पार पडली. विषयाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थ्यानी आपले विचार मांडले. यात विषयाच्या बाजूने उमाकांत विनोद मिश्रा (सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर) व आयोजित महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेश अरुण सिडाम या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. व द्वितीय पारितोषीक हर्षल साळवे (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, बल्लारपूर) यानी पटकावले. विपक्ष्याच्या बाजूने आयोजित महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. शिद्धि माधव अलोनी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला व व्दितीय पारितोषीक शुभम अनिल मेश्राम ( सुशीलाबाई रामचंद्र समाजकार्य महाविद्यालय, चंद्रपूर) या विद्यार्थ्याने पटकावले. गुनानुक्रमे सांघिक पारितोषीक आयोजक महाविद्यालयाने पटकावले. प्रसंगी, संस्थेचे सचिव श्री. शशिकांत धर्माधिकारी, उपाध्यक्ष अँड. प्रणव वैरागडे, माजी प्राचार्य ते. क. कापगते, मा. पुल्लकवार, मा. विनायकराव तुपकर, प्राचार्य अशोक झाडे मंचावर उपस्थीत होते. मा.प्रा.चंद्रकांत मणियार व डॉ.गोकुल कामडी यांनी उत्तमरित्या परिक्षकांची भूमिका निभावली व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ. जी. एस. आगलावे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व्ह सर्व विभागाचे विभाग प्रमूख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!