धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न.


                  
धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न.

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत  धर्मसेवा प्रतिष्ठान या न्यासातर्फे शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी  सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा, तुकुम, चंद्रपूर, येथे बालसंस्कार शिबीर घेण्यात आले. 
    धर्मसेवा प्रतिष्ठान या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. 
              भावी पिढी संस्कारक्षम व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. 
               न्यासाच्या वतीने सौ. नंदा बिहाडे यांनी मार्गदर्शन केले .या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकवृंद  यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
      या उपक्रमाचा लाभ ७५  विद्यार्थ्यांनी घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!