भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय शासकीय दुकान गाळ्यात
नियमबाह्य पद्धतीने केला जातोय वापर
मुख्याधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील प्रकार
उप संपादक
विलास मोहिनकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात चिमूर हे गाव ग्राम पंचायत असता पासून युवा शक्ती ते भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय नगर परिषदेच्या शासकीय दुकान गाळ्यातच आहे.यामुळे सुशिक्षित बोरोजगाराला रोजगार मिळायचा तो मिळाला नसल्याने सर्वसामान्य बेरोजगार जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता गोर गरीब विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण घेऊन पैसा आणि जागा याचा अभाव असल्यामुळे स्वतःची दुकान टाकू शकत नाही. यामुळे शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासकीय दुकान गळ्याची निर्मिती केली. परंतु या गाळ्यामध्ये बेरोजगार लोकांना रोजगाराची संधी न देता श्रीमंतांना कोट्याधीश असलेल्या आमदारांना हा शासकीय दुकान गाळा उपलब्ध करून देण्यात आला आहे.यामुळे चिमूर शहरात अनेक युवा मुले - मुली बेरोजगार आहेत.याकडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे.परंतु गोर गरीब जनतेनी रोजगार निर्मिती आणि परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी कुणी चहा टपरी,पान ठेला,उपहारगृह, अशी दुकाने शहराच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा छोटे - छोटे दुकाने लावली मात्र चिमूर शहरात नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण धारकांच्या दुकानांवर डोजर चालविने सुरु केले असून यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहे.तर हा बेरोजगारी चा प्रकार का निर्माण झाला चिमूर शहरात कित्तेक वर्षांपासून कंपनी कारखाना याची निर्मितीच झालेली नाही,आरोग्याच्या सुविधा नाहीत,शिक्षणाच्या सुविधा नाहीत म्हणून आजही तालुक्यातील जनतेला १०० किमी अंतरावरील चंद्रपूर नागपूर याठिकाणी रोजगार,उपचार आणि शिक्षणाच्या शोधात जावे लागत आहे.असे असतांना सुद्धा बळजबरीने गोरगरीब जनतेच्या दुकानांवर डोजर चालवीला जात आहे. याकडे जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचेही दुर्लक्ष होतांना दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!