धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न.



                                                     
                    
धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न. 

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *धर्मसेवा प्रतिष्ठान या न्यासातर्फे शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी जि.प .उच्च प्राथमिक शाळा चिखली त .मुल* येथे बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले .
    धर्मसेवा प्रतिष्ठान या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
       भावी पिढी संस्कारक्षम व्हावी हा उद्देश लक्षात ठेवून न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.
               न्यासाच्या वतीने सौ.गिता कोंतमवार आणि सौ भारती कोंतमवार यांनी परिश्रम घेतले .
     या उपक्रमासाठी *शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .भाग्यलक्ष्मी रणदिवे* आणि इतर शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
      या उपक्रमाचा लाभ १७३  विद्यार्थ्यांनी घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!