चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी प्रा.अशोक उईके यांची निवड

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - दिनांक. 18 जानेवारी रोजी अखेर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पालकमंत्री व सह पालकमंत्री यांची निवड करण्यात आली राज्याचे उपसचिव देशपांडे यांच्या आदेशान्वये शासन निर्णय आज काढण्यात आला चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा अशोक उईके यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे ते राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून आहे त्यामुळे पालकमंत्री जवळील असल्याने त्यांचा दौरा नेहमीच होणार आहे . चंद्रपूर जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून दिले,यात सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे ,करण संजय देवतळे,व बंटी भांगडीया हे मोठ्या मताधिक्य घेऊन निवडून आले ,चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्री पद मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांना होती परंतु मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाले नाही, यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत एकंदरीत आजपर्यंत स्थानिक पालकमंत्री असायचा परंतु जिल्ह्यातील पाच आमदार पैकी एकाही मंत्र्याला मंत्रिपद न मिळाल्याने पालकमंत्र्यापासून जिल्ह्याला मुकावे लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!