मूल एमआयडीसीत हजारो ब्रास चोरीची रेती? तस्कराला अभय कुणाचे?
मूल तालुक्यात रेती तस्करीने उच्छाद मांडला आहे. स्थानिक महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष कि मिलीभगत हे कळायला मार्ग नसले तरी, एका बड्या कंपनीने मूल तहसिल कार्यालयाच्या अगदी तीन कि.मी. परिक्षेत्रात हजारो ब्रास रेतीचा अवैद्य साठा केला असल्यांचे उघड झाल्यांने, मूल तहसिल प्रशासनाच्या प्रामाणीकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मूल एम.आय.डी.सी. परिसरात या कंपनीने मूलच्या उमा नदीतून हजारो ब्रास रेतीची चोरी केली आहे. मूलच्या स्थानिक रेती तस्कर वाहतूकदाराचे माध्यमातून ही रेती चोरी केल्याची खुली चर्चा या परिसरात आहे.
मूल तालुक्यातील हायवा मालक, जेसीबी मालकांकडून ही रेती चोरी या कंपनीकरीता केली जात असल्यांचा आरोप आहे. एम. आय. डि.सी. मध्ये तयार होत असलेले सिमेंट रस्ते आणि एका बड्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या कामाकरीता ही चोरीची रेतीचा वापर केला जात आहे.
चंद्रपूर जिल्हयात सध्या रेती घाटाचे लिलाव झालेले नाही. अशा परिस्थितीत हजारो ब्रास रेती, दिवस—रात्र उत्खनन करून, वाहतूक करीत असतांना मूलच्या तहसिल प्रशासनाला दिसू नये? यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर, या कंपनीकडून तहसिल कार्यालयातील बड्या अधिकार्यांना लाखो रूपये देवून, रेती चोरीचा परवाना मिळविला असल्याचीही माहीती आहे.
याबाबत मूलचे तहसिलदार मृदुला मोरे यांचेशी संपर्क साधून, मरेगांव येथील हजारो ब्रास रेती साठ्याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी मूल येथील नदी घाटांचा लिलाव झालेला नाही त्यामुळे मूलच्या नदीची रेती नसल्याचे सांगितले, परंतु सदर रेती साठ्याची चौकशी करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली
याच परिसरात ट्रॅक्टरने होत असलेली रेती तस्करी, मरेगांवच्या महिला सरपंचानी थांबविण्यांचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमात चांगलाच वायरल झाला होता. या घटनेतील रेती तस्कारांवरही मूलचे तहसिल प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्यांची माहीती नाही किंवा तसे प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतरही सांगण्यात आले नाही. रेती तस्करांनी ज्या पध्दतीने, या महिला सरपंचाशी वाद घातला, त्यावरून, मूलच्या तहसिल कार्यालयातील अधिकार्यांचाही या तस्करीत सहभाग आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे, लहान—लहान रेती वाहतूक करणार्यांकडून बड्या रकमेचे दंड वसुल करणारे तहसिलदार, बड्या रेती तस्कारांवर मेहरबानी दाखवित आहेत असाही आरोप होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!