वडिलांच्या श्रध्देला स्मृती देत विहारास डॉ. आंबेडकर यांचे पुतळ्याचे अनावरण
वडिलांची श्रध्दा ज्या विहारात होती, त्या विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळ्याचे दान करून, त्याचे अनावरण करण्यांचा स्तुत्य उपक्रम चरूरखटी येथील रूपेश तेलंग यांनी केला.
वरोरा तालुक्यातील दिवंगत भगवान लक्ष्मण तेलंग यांचे स्मृतीप्रित्यर्थ संबोधी बुध्द विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण भदंत धम्मघोष मेत्ता महाथेरो व संघ यांच्या हस्ते परित्रान पाठ घेऊन करण्यात आले.
दिवगंत भगवान लक्ष्मण तेलंग हे आपल्या हयातीत नियमीत संबोधी बुध्द विहारात जात असे. वडिलांची या विहाराप्रती असलेली श्रध्दा लक्षात घेवून, त्यांचे चिरंजीव रूपेश तेलंग यांनी या विहारात डॉ. आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आणि भोजनदान देण्यांचा निर्णय घेतला व त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
डॉ. आंबेडकर यांचे पुतळ्याचे अनावरण प्रसंगी चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, वरोरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष मिलींद भोयर, शिवसेना नेते बंडू डाखरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष अविनाश ढेंगळे, माजी उपसभापती देवानंद मोरे, प्रमोद मगरे, माजी नकरसेवक प्रमोद काळे, संजय घागी सह अनेक मान्यवरांनी या विहारास भेट देत शुभेच्छा दिल्या.
खासदार धानोरकर दिड तास विहारात
चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी संबोधी विहारात भेट देवून तब्बल दिड तास विहारात घालविले. या विहारात आपल्याला आत्मिक शांतता मिळाली असल्यांने ऐवढा काळ आपण विहारात रममान झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. बौध्द भदंत यांचेकडून त्यांनी थोडक्यात बौध्द धम्माची माहीती घेतली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!