उद्या मंत्रीमंडळाचा शपथविधी? मुनगंटीवारांना मिळणार 'हे' मंत्रालय!
उद्या मंत्रीमंडळाचा शपथविधी? मुनगंटीवारांना मिळणार 'हे' मंत्रालय!
राज्यातील महायुती सरकारचे बहुचर्चित मंत्रीमंडळाचा शपथविधी 15 डिसेंबरला होत आहे. याआधी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजीत पवार यांचा शपथविधी संपन्न झाला आहे. सरकार स्थापन झाले असले तरी, मंत्रीमंडळाची शपथविधी न झाल्यांने सरकारला पूर्णपणे चेहरा मिळालेला नाही. मंत्रीमंडळाची शपथविधी कधी होणार? कोणत्या पक्षाचे किती मंत्री केले जाणार? कुणाला संधी मिळणार? कुणाकडे कोणते खाते मिळेल? याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे. जनतेची उत्सुकता लवकरच संपणार असल्यांचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्रीमंडळात भाजपा 20, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रीपदे दिली जाणार असल्यांचे विविध वृत्त वाहीन्यावर झळकत आहे. दिनांक 16 डिसेंबरला राज्य विधी मंडळाचे अधिवेशन नागपूरात संपन्न होत आहे. या अधिवेशानाआधीच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्यांची माहीती आहे. दिनांक 15 डिसेंबर रोजी नागपूरात नविन मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार असल्यांची माहीती मिळाली आहे. विदर्भातून सर्वाधिक म्हणजे 7 वेळा निवडून आलेले सुधीर मुनगंटीवार यांना कोणते मंत्रालय मिळणार? याकडे त्यांच्या चाहत्याचे, समर्थकांचे, कार्यकर्त्यांचे आणि जिल्हयातील जनतेचे लक्ष लागले आहे. यापूर्वी सुधीर मुनगंटीवार हे पर्यटन मंत्री, वने, अर्थ, सांस्कृतीक कार्य व मत्सविकास मंत्री म्हणून यशस्वी कार्य केलेले आहे. नव्या मंत्री मंडळात सुधीर मुनगंटीवार यांना अर्थ मंत्रालय किंवा उर्जा मंत्रालय मिळेल अशी खात्रीलायक माहीती आहे.
अर्थ मंत्रालय राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांचेकडे आहे. हे खाते भाजपा आपल्याकडे घेवून, या खात्याचा अनुभव असलेले सुधीर मुनगंटीवार यांचेकडे दिले जाईल अशी शक्यता एका कार्यकर्त्यानी व्यक्त केली.
अर्थ मंत्रालय सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी यशस्वीरित्या सांभाळले आहे. त्यांनी अर्थ मंत्रालयातील केलेल्या कार्यामुळे त्यावेळचे केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेठली यांनी एक्सलंस मिनीस्टर हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता. अनेक संस्था, संघटनानी त्यांना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!