घोटाळा सीडीसीसी बँकेचा, खुलासा वायरल करीत आहेत काँग्रेस कार्यकर्ते!
CDCC बँक कर्मचारी भरती मोठा भ्रष्टाचार आता उघडकीस येत असून या भ्रष्टाचारामुळेच ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याची नामुष्की बँकेवर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कल्याणकर यांनी, परीक्षेच्या पहिल्या दिवशी चे पेपर तांत्रिक कारणामुळे रद्द केल्याचे सांगत असले तरी, भरती प्रक्रियेतील गोंधळामुळेच हा पेपर रद्द करण्यात आल्याची चर्चा ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारात आहे.
मागील अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली आहे. या भरती प्रक्रियेत अनेक संचालकांनी आणि जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींनी लिपिक पदाकरिता 40 लाख कृपयापर्यंत तर चपराशी पदाकरिता तीस लाख रुपये पर्यंत उमेदवाराकडून रक्कम घेतल्याचा खुला आरोप होत आहे. असाच आरोप चंद्रपूरच्या आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर विधिमंडळात केला आहे. अनेकदा ही प्रक्रिया न्यायालयातही अडकली होती. टीसीएल मार्फत भरती प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे संचालकांनी हायकोर्टाला सांगून भरतीची परवानगी मिळवली मात्र प्रत्यक्षात आयटीआय या कंपनीमार्फत भरती प्रक्रिया सुरू केल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात या भरती प्रक्रियेत आरक्षण लागू न केल्याचा मुद्दा ही चर्चेला आला होता. निवडणूक संपताच बँकेच्या संचालकांनी तातडीने हायकोर्टात जाऊन ही भरती प्रक्रिया सुरळीत सुरू करून घेतली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांचे ऑनलाइन उत्तर आपोआप बदलत असल्याने सर्वच केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. या परीक्षेत मोठा घोटाळा असल्याचा आरोप ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेचे परीक्षा केंद्र मात्र नागपूर पुणे औरंगाबाद अशा दूरवर दिल्याने अनेक उमेदवारांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला.
पहिल्या दिवशीच्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करून ती पुढे घेण्यात येईल असे सांगण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कल्याणकर यांनीही तांत्रिक अडचण असल्याचे आणि पेपर फूट झाली नसल्याची प्रतिक्रिया दिली. ज्या कंपनीमुळे हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागला अशा विद्यार्थ्यांची भरपाई बँक अथवा परीक्षा घेणारी कंपनी करून देणार आहे काय असा सवाल या उमेदवाराकडून केला जात आहे? ज्या कंपनीमुळे या उमेदवारांना आर्थिक शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागला त्या कंपनीवर जिल्हा मध्यवर्ती बँक कोणती कारवाई करणार? याबाबत मुख्य कार्यपालन अधिकारी कल्याणकर यांनी काहीही बोलले नाही हे उल्लेखनीय. कंपनीची ही तांत्रिक चूक असेल तर उमेदवाराची झालेली नुकसान कंपनीकडून काढून उमेदवारांना द्यावी, या कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावे अशी मागणी परीक्षा त्याच्याकडून केली जात आहे.
काँग्रेस कार्यकर्त्याचा अनाकलनीय पुढाकार!
जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती प्रक्रिया तांत्रिक कारणाने अडकल्याची प्रतिक्रिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कल्याणकर यांनी दिली. त्यांच्या प्रतिक्रिया च्य बातम्या मूल शहरातील काँग्रेसच्या काही प्रमुख पदाधिकारी वायरल करीत आहेत. बँकेच्या परीक्षेत पेपर फुटी झाली नाही, सेटिंग केलेल्या उमेदवारांना उत्तराचे पीडीएफ आधीच दिले नाही, ही तांत्रिक चूक आहे याचा खुलासा बँकेचे अधिकारी म्हणून श्री कल्याणकर यांनी केला, मात्र बँकेचे प्रवक्ते असल्याप्रमाणे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या बातम्या वायरल का करीत आहेत हे उमगणारे कोडे आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!