वैनगंगा विद्यालयात तुळस पुजन कार्यक्रम संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात श्री.योग वेदांत समिती नागपूर द्वारा  तुळशीचे संवर्धन, महत्व व पूजन आदी कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले.याप्रसंगी मानवाधिकार आयोगाचे सदस्य कन्सल्टंट प्रवीण कुलकर्णी,यांनी मानवाच्या जीवनात तुळशीचे महत्त्व अनन्य साधारण असते. तुळसी रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करून भरपूर  प्राणवायू देणारी वनस्पती आहे.त्याप्रमाणे तुळशीचे एकूण आठ नावे विद्यार्थ्यांना सांगितले. तुळस पणाच्या नियमित सेवनाने उत्तम आरोग्य लाभते,तुळस पूजनाने आपले मातृ पितृत्वाचे ऋण सुद्धा फेडता येतात याविषयी महत्त्व विशद केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी तुळशीचे पूजन केले व आरती केली.याप्रसंगी सुशीला कावरे नागपूर प्राची कुलकर्णी नागपूर विरमाता सुदाम मोहरकर पवनी, वैनगंगा शिक्षण संस्थेच्या संचालिका भावना दरेकर प्राचार्य पराग टेंभेकर उप प्राचार्य पर्यवेक्षक प्रमोद मेश्राम विद्यालयातील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा शालेय विद्यार्थी उपस्थित होते.या प्रसंगी अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  व आभार सिमा गंडाते यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!